गौरव- मुसा पहिल्या फेरीचे विजेते
By Admin | Updated: November 23, 2014 00:20 IST2014-11-22T23:53:41+5:302014-11-23T00:20:22+5:30
महिंद्रा अॅडव्हेंचर्स राष्ट्रीय अजिंक्यपद कार रॅली

गौरव- मुसा पहिल्या फेरीचे विजेते
बंगळुरू - कर्नाटक मोटर्स क्लब व महिंद्रा अॅडव्हेंचर्स क्लबच्या वतीने आयोजीत के- १००० रॅलीच्या आज झालेल्या पहिल्या टप्प्याचे महेंद्रा क्लबच्या गौरव गिल व मुसा शरिफ हे विजेते ठरले़ स्थानिक गुणवंत चालक अर्जुन राव अरोरा व सतीश राजगोपाल यांची कार खराब झाल्याने त्यांना या फेरीतून बाहेर पडावे लागले यामुळे ते द्वितिय स्थानी आले आहेत़ महिंद्राचे गौरव गिल व मुसा शरिफ यांनी आज १ तास ५ मिनीट १४़ ४ सेकंद वेळ नोंदवत १४५ गुणांची कमाई करून प्रथम स्थान मिळवले़ अरोरा व राजगोपाल यांनी ७८ गुण मिळवत दुसरे स्थान कायम राखले़ तर सिद्धू आणि मुर्ती यांनी ६२ गुण मिळवत तृतीय स्थान राखले़ आज रॅलीत ४१ कार्सचा सहभाग होता़ परंतु खडतर रस्त्यांवर त्यांचा चांगलाच कस लागून पैकी दहा कार खराब झाल्या त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले़ पुढील फेरी चिकमंगळुरू येथे होणार असून आयआरसी - २०००, आयआयसी १६०० व एफएमएसीसीआय १६०० अश विविध गटात या स्पर्धा होणार आहेत़