Gaudbangal for the permission of water; | पाणी परवानगीचे गौडबंगाल, ५७९ शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात
पाणी परवानगीचे गौडबंगाल, ५७९ शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : नव्याने अर्जाच्या अटीमुळे शेतकरी संतप्त

घोटी : नाशिक पाटबंधारे विभागाने धरणांच्या लाभक्षेत्रातुन व पाणलोट क्षेत्रातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी परवानगी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र गेल्या वर्षी ५७९ शेतकºयांनी केलेल्या मागणी अर्जावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे गंभीर चित्र आहे. अर्ज सादर करूनही अद्याप पाणी परवानग्या दिल्या नसतांनाही एकीकडे परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सुपिक जमिनी धरणासाठी संपादित झाल्याने शेतकºयांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला. यानंतर झालेल्या धरणाच्या उंची वाढीसाठी भूसंपादन झाले. त्यामुळे अनेक कुटुंब पूर्णत: भूमिहीन झाले. काही शेतकºयांनी उरलेल्या माळरानावर उदनिर्वाहासाठी जमीन सपाटीकरण करून ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षी नाशिक पाटबंधारे खात्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करु न पाणी परवानगीसाठी अर्ज केले. संबंधितांनी वेगवेगळ्या जाचक अटी लादत अनेक प्रकारचे कागदपत्र मागवले. यानंतर शेतकºयांनी सर्व अटी, शर्ती, कागदपत्रांची पूर्तता केली. तथापि पाटबंधारे विभागाने शेतकºयांना प्रतिक्षेतच ठेवले. प्रदीर्घ कालावधीनंतर काही शेतकºयांना ठराविक कालावधीसाठीच परवानग्या देण्यात आल्या. मात्र आता अनेक अर्जदार शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी परवानगीसाठी वर्षापूर्वी अर्ज केले आहेत. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे यांनी शेतकºयांच्या बैठका घेऊन २०१८ मध्ये सामुहिक पाणी परवानगीसाठी नाशिक पाटबंधारे विभागाकडे अर्ज सादर केले आहेत. मागणी अर्ज करून वर्ष झाले तरी यावर्षी नव्याने अर्ज करण्याचे विभागाने सांगितल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.याप्रश्नी नवीन आमदार हिरामण खोसकर यांनी लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title:  Gaudbangal for the permission of water;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.