गॅस टँकर उलटला

By Admin | Updated: August 30, 2015 21:31 IST2015-08-30T21:30:40+5:302015-08-30T21:31:35+5:30

वीरगाव : विंचूर-प्रकाशा मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याने गैरसोय

Gas tanker overturned | गॅस टँकर उलटला

गॅस टँकर उलटला

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमहामार्गावर वीरगावजवळील लकड्या पुलावर शुक्रवारी सकाळी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. यात चालक गंभीर जखमी झाला. गॅस गळतीच्या भीतीने महामार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली होती; काही वेळात वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
सुरतजवळील हाजीर येथील गॅस प्लाण्टमधून सिन्नरकडे जाणारा टँकर वीरगावजवळील वळणावर पलटी झाल्याने चालक मोहम्मद जावेद गंभीर जखमी झाला. वळणाचा अंदाज न आल्याने सदर घटना घडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सटाणा येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन मगर यांनी परिस्थितीची पाहणी केली. गॅस गळती होत नसल्याची खात्री करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली, तर दुपारनंतर क्रेनच्या साहायाने टँकर उचलण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Gas tanker overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.