कसारा घाटात गॅस टँकरला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 17:26 IST2019-04-03T17:25:20+5:302019-04-03T17:26:40+5:30
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात गॅस टँकरला अचानक आग लागल्यामुळे काही काळ मुंबईहुन नाशिककडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला होता. मात्र हा भीषण अपघात वेळी दक्षता घेतल्याने थोडक्यात निभावला.

जुन्या कसारा घाटात गैस टँकरला लागलेली आग विझवतांना कर्मचारी.
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात गॅस टँकरला अचानक आग लागल्यामुळे काही काळ मुंबईहुन नाशिककडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला होता. मात्र हा भीषण अपघात वेळी दक्षता घेतल्याने थोडक्यात निभावला.
याबाबत अधिक माहीती अशी की, दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाटातील टोप बावडी जवळ हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधील ड्रायव्हर कॅबिनला अति उष्णतेमुळे व शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या घटनेची माहीती घोटी टँब पोलीस यांना समजताच व घोटी टोलप्लाझावरील पिंक इन्फ्रा व इगतपुरी नगर पालिका अग्निशमन पथकाचे नागेश जाधव, फीरोज पवार, प्रमोद भटाटे, पिंक इन्फ्राचे पेट्रोलिंग टीमचे सुरज आव्हाड, राहुल पुरोहित, अनिल ठाकुर, उमेर शेख, रवी दुर्गुडे, महेश घोटकर, दिपक उघडे, समीर चौधरी, सचिन मागे, वसीम शेख, सचिन भडांगे व महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत टँकरची कॅबिन पुर्णपणे जळुन खाक झाली. सुदैवाने ही आग गॅस टँकरला न लागल्याने मोठी दुर्घटना टळली. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईला जाणारी व नाशिककडे येणारी वाहतुक नवीन कसारा घाटातुन वळवण्यात आल्याने वाहतुक संथ गतीने सुरू होती. तब्बल तीन तासानंतर जुना कसारा घाट पुर्ववत चालू करण्यात आला.