शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

गॅस गळतीची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:17 IST

नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे-पळसे टोलनाक्याजवळ गॅस भरलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर झालेली धावपळ.. गॅस गळती थांबविण्यासाठी सिन्नर आणि परिसरातून सायरन वाजवत आलेली आपत्कालीन यंत्रणा... त्यानंतर हे मॉकड्रिल (रंगीततालीम) असल्याचे समजल्यानंतर दोन्ही बाजूने थोपवून धरलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन : यंत्रणांच्या समन्वयाची पडताळणी

सातपूर : नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे-पळसे टोलनाक्याजवळ गॅस भरलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर झालेली धावपळ.. गॅस गळती थांबविण्यासाठी सिन्नर आणि परिसरातून सायरन वाजवत आलेली आपत्कालीन यंत्रणा... त्यानंतर हे मॉकड्रिल (रंगीततालीम) असल्याचे समजल्यानंतर दोन्ही बाजूने थोपवून धरलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.जागतिक आपत्ती निवारण सप्ताहानिमित्ताने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे, पळसे गावाजवळील टोलनाक्यावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस भरलेल्या टँकरमधून गॅसगळती झाल्यानंतर आपत्कालीन व्यवस्था किती वेळेत पोहोचते आणि काय काय उपाययोजना केली जाते याचे निरीक्षण आणि नोंद घेण्यात आली. निरीक्षक म्हणून बॉश कंपनीचे पी. आय. शर्मा, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीचे सचिन मोरे, मनोज पाटील, वामन कराळे, विकास दंडवते आदींनी काम पाहिले.यावेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक देवीदास गोरे, उपायुक्त डी. आर. खिरोडकर, व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, नायब तहसीलदार शेवाळे, डॉ. किरण मोघे, के. टी. झोपे, विलास बिडवे, मार्गचे अध्यक्ष नोबर्ट डिसूझा, पी. आर. घोलप, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगामॉकड्रिलदरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक व्यवस्था थोपवून धरली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. मॉकड्रिल संपल्यानंतर निरीक्षकांनी केलेल्या निरीक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. त्यात कोणी आणि कशी भूमिका बजावली, कुठे चूक झाली आणि भविष्यात असा प्रसंग निर्माण झालाच तर अजून काय सुधारणा केली पाहिजे, हे निरीक्षकांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकfire brigade puneपुणे अग्निशामक दल