गॅस गळतीमुळे घरात आगीचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:45 IST2021-01-08T04:45:17+5:302021-01-08T04:45:17+5:30

सिडकोतील डाॅ. हेडगेवार नगर, त्रिमूर्ती चौक येथे बबलु प्यारेलाल कनोजिया हे राहतात. गुरुवारी सकाळच्या सुमारास यांच्या घराला ...

A gas leak caused a fire in the house | गॅस गळतीमुळे घरात आगीचा भडका

गॅस गळतीमुळे घरात आगीचा भडका

सिडकोतील डाॅ. हेडगेवार नगर, त्रिमूर्ती चौक येथे बबलु प्यारेलाल कनोजिया हे राहतात. गुरुवारी सकाळच्या सुमारास यांच्या घराला गॅस गळतीमुळे भीषण आग लागली. विजेचा बल्ब सुरू केल्यानंतर आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीचे धूर खिडकीतून बाहेर आल्यानंतर नागरिक जमा झाले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक भाग्यश्री ढोमसे, राकेश ढोमसे यांनीही घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण केले. सातपूर अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत घरातील फ्रीज, फर्निचर, पलंग, गादी व संसार उपयोगी सुमारे तीन लाखांच्या वस्तू जळून नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाबरोबरच परिसरातील निखिल आडे, स्वप्नील गडगे, अनूप माळी, प्रीतम जाधव, नितेश चौधरी आदींनी आग विझविण्यासाठी मदतकार्य केले.

Web Title: A gas leak caused a fire in the house