नाशिकमध्ये तहसीलदारांच्या हस्ते गॅसचे वाटप
By श्याम बागुल | Updated: September 12, 2018 15:36 IST2018-09-12T15:35:20+5:302018-09-12T15:36:10+5:30
गिरणारे गावातील मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये गॅस कनेक्शन वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गॅस वितरकांच्या माध्यमातून अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातींसाठी असलेल्या या योजनेसाठी आदिवासी भागातील महिलांनी फॉर्म भरले होते. ज्यांची नावे यादीत येऊन

नाशिकमध्ये तहसीलदारांच्या हस्ते गॅसचे वाटप
गंगापूर : गिरणारे येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप संजय गांधी योजनेच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले.
गिरणारे गावातील मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये गॅस कनेक्शन वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गॅस वितरकांच्या माध्यमातून अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातींसाठी असलेल्या या योजनेसाठी आदिवासी भागातील महिलांनी फॉर्म भरले होते. ज्यांची नावे यादीत येऊन त्यांना गॅस कनेक्शनचे वाटप यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लगतच्या ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. हा कार्यक्रम पुरवठा विभागाचा असून, त्या कार्यक्रमाप्रसंगी संजय गांधी योजनेचे तहसीलदार उपस्थित राहणे म्हणजे निवडणुकीची चाहूल लागल्याने प्रचाराचा सोपस्कार या माध्यमातून करण्याचा डाव तर नाही ना? अशी चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. यावेळी गिरणारेच्या ग्रामपंचायतीचे सरपंच अलका दिवे, उपसरपंच तानाजी गायकर, ग्रामविकास अधिकारी आय. बी. पाटील, विष्णू थेट, गोरख थेट आदी उपस्थित होते.