टाकेद येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:32 IST2020-02-14T12:31:50+5:302020-02-14T12:32:13+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घर खाक झाले. सुदैवाने जिवित ...

 Gas cylinder explosion at Takeda | टाकेद येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

टाकेद येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घर खाक झाले. सुदैवाने जिवित हानी टळली. येथील घोरपडे झापवस्तीतील मळ्यालगत असलेल्या पोपट चिंधु धादवड या आदिवासी शेतकरी कुटुंबातील घरातील गॅसने सकाळी नऊ वाजता स्वयंपाक करतवेळी अचानक पेट घेतला. सदर आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट झालेल्या गॅस सिंलिंडरच्या आगीत श्री धादवड यांच्या घरातील टेलिव्हिजन, धान्य,भांडी कुंडी,आधार कार्डसह अत्यावश्यक गरजेचे कागदपत्रे, सर्व गरजेच्या वस्तूंसह संपूर्ण घराचे नुकसान झाले. सिलींडर स्फोटाच्या आवाजाने घटनास्थळी शेजारील सर्व ग्रामस्थांनी धाव घेतल्याने घराला लागलेली आग मोटारीच्या पाण्याने आटोक्यात आणण्यात झापवस्तीलगत असलेल्या ग्रामस्थांना यश आले.

Web Title:  Gas cylinder explosion at Takeda

टॅग्स :Nashikनाशिक