भिलवाड येथे गॅसचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:22 IST2018-04-19T00:22:45+5:302018-04-19T00:22:45+5:30

ताहाराबाद : पर्यावरण संतुलन ही काळाची गरज बनली असुन, जंगल सवंर्धन व संरक्षणाची प्रत्येकाने वैयक्तीक जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार यांनी केले. ताहाराबाद वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने भिलवाड (मांगीतुंगी) येथे गरजु लाभार्थीना अनुदानित गॅस वाटप कार्यक्र म संपन्न झाला,

Gas allocation at Bhilwad | भिलवाड येथे गॅसचे वाटप

भिलवाड येथे गॅसचे वाटप

ठळक मुद्देगरजु लाभार्थीना अनुदानित गॅस वाटप


ताहाराबाद : पर्यावरण संतुलन ही काळाची गरज बनली असुन, जंगल सवंर्धन व संरक्षणाची प्रत्येकाने वैयक्तीक जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार यांनी केले. ताहाराबाद वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने भिलवाड (मांगीतुंगी) येथे गरजु लाभार्थीना अनुदानित गॅस वाटप कार्यक्र म संपन्न झाला, याप्रसंगी पवार अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे, प्रदीप बच्छाव, सरपंच बाळू लालजी पवार, उखा गणपत पवार, मिलिंद चित्ते, नीलेश कांकरीया, योगेश गांगुर्डे, पोलीसपाटील सतिष कुंवर, माजी सरपंच मुरलीधर पवार, पंढरीनाथ ठाकरे, सखुबाई ठाकरे, ग्रामसेवक कुवर आदी उपस्थित होते.

Web Title: Gas allocation at Bhilwad

टॅग्स :Nashikनाशिक