गोरगरिबांना दिवाळीत कपड्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 18:02 IST2018-11-04T18:00:55+5:302018-11-04T18:02:36+5:30

येवला तालुक्यातील राजापूर येथे स्व. गणेश धात्रक शिक्षण संस्था संचलित एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे व गणाधिश स्कूलच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त गावातील गरीब, गरजू मुलांना व महिलांना मोफत कपडे वाटप करण्यात आले.

Garibi babies gifts to jewelers in Diwali | गोरगरिबांना दिवाळीत कपड्यांची भेट

गोरगरिबांना दिवाळीत कपड्यांची भेट

यावेळी परिसरातील मुलांनी व महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक, गणाधिशचे प्राचार्य प्रशांत बोडके, अमोल सानप, सुरेश धात्रक, सागर पाठक, तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक आव्हाड, अनिल अलगट, डॉ.अविनाश विंचू , पप्पू बोडखे, बबन अलगट, शिक्षक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Garibi babies gifts to jewelers in Diwali