सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी कचरु गंधास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 18:02 IST2020-01-20T18:02:26+5:302020-01-20T18:02:48+5:30

सिन्नर : सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी कचरु शिवराम गंधास तर उपाध्यक्षपदी छबू गंगाधर थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 Garbage Gandha, President of Sinnar Taluka Purchase Sales Team | सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी कचरु गंधास

सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी कचरु गंधास

संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब तांबे व उपाध्यक्ष नीता वारुंगसे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. संस्थेचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सहाय्यक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा बोलविण्यात आली होती. निर्धारित वेळेत अध्यक्षपदासाठी कचरु गंधास यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून संचालक वसंत आव्हाड यांनी अनुमोदक म्हणून सुकदेव वाजे यांनी स्वाक्षरी केली होती. उपाध्यक्षपदासाठी छबू गंगाधार थोरात यांच्या उमेदवारी अर्जावर संचालक नामदेव सांगळे यांनी सूचक म्हणून तर दत्तू आव्हाड यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठी अनुक्रमे गंधास व थोरात यांची प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी रुद्राक्ष यांनी केली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गंधास व उपाध्यक्ष थोरात यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक भाऊसाहेब तांबे, नीशा वारुंगसे, दत्तू आव्हाड संजय सानप, नवनाथ घुगे, सुकदेव वाजे, रमेश जाधव, बाळासाहेब जुंधारे, रावसाहेब शिंदे, फकीरराव हिरे, नामदेव सांगळे, गणेश गिते, नितीन अढांगळे, विठ्ठल राजेभोसले यांच्यासह व्यवस्थापक संपत चव्हाणके उपस्थित होते.

Web Title:  Garbage Gandha, President of Sinnar Taluka Purchase Sales Team