शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नाशिकमध्ये भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 16:23 IST

- अझहर शेखनाशिक : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली. ती केवळ डीजे आणि गुलाल उधळणीला फाटा दिल्यामुळे. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा च्या वादनात बाप्पाची मिरवणुकीला दुपारी बारा वाजता सुरुवात करण्यात आली. प्रारंभी नाशिक महापालिकेचा मानाचा गणपती प्रथम क्रमांकावर ...

- अझहर शेख

नाशिक : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली. ती केवळ डीजे आणि गुलाल उधळणीला फाटा दिल्यामुळे. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा च्या वादनात बाप्पाची मिरवणुकीला दुपारी बारा वाजता सुरुवात करण्यात आली. प्रारंभी नाशिक महापालिकेचा मानाचा गणपती प्रथम क्रमांकावर होता या मिरवणुकीत सुमारे 21 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला. सर्वच गणेश मंडळांनी डीजे वापरावर बंदी घातली याऐवजी नाशिकचा प्रसिद्ध ढोल ला पसंती दिली. त्यामुळे शहरातील सगळ्याच ढोल पथकाला रोजगार रोजगारही मिळाला पारंपारिक पोषाखात तरुण-तरुणी कमरेला ढोल-ताशा बांधून वाजत गाजत बाप्पाला निरोप देत होते. यावेळी काही पथकांमधील सदस्यांनी ध्वजकरीची भूमिका पार पडली हातात उंचच उंच भगवे ध्वज घेऊन हे ध्वजकरी ढोल ताशांच्या तालावर थिरकत होते.  मिरवणुकीत शहरातील एकूण 21 मंडळांनी सहभाग घेतला आहे.  दुपारी सव्वा बारा वाजता मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन,  महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, स्वामी संविदानंद सरस्वती, भक्तीचरणदास महाराज, गजानन शेलार, विनायक पांडे, समीर शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. मिरवणूक फाळके रोड येथून सुरू झाली. दूध बाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, रेडक्रॉस सिग्नलमार्गे रविवार कारंजा, अहळ्यादेवी होळकर पूल वरून मालेगाव स्टँड वरून पंचवटी कारंजा, म्हसोबा पटांगण गोदकाठावर पोहचणार आहे. यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल पथक मुख्य आकर्षण ठरत आहेत. सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रा मंडळाचा नाशिकचा राजा, सत्यम मित्रमंडळाच्या मानाचा राजा या दोन गणरायाच्या मुर्ती सुमारे वीस फुटी आहेत. मुंबई नाका युवक मित्र मंडळाने कालियाना मर्दनचा आकर्षक पुष्प सजावट करून त्यात बाप्पाला विराजमान केले होते. तसेच रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संपूर्ण मिरवणूक मार्ग 50 सीसीटीव्ही केमेऱ्यांच्या नजरेत होता. तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', 'मंगलमूर्ती मोरया, बाप्पा मोरया,' 'अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला', ' असा जयघोष करत बापाला भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान, घरगुती मंडळांनी देखील बाप्पाला उत्साहात निरोप दिला, यावेळी गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन करत नाशिककरांनी 'वुई विल डू नो पोलूशन, इको फ्रेंडली गणपती सोल्युशन' असा संदेश देत गोदमायचे प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावला. यावेळी तपोवन, गंगापूर रोड, नासर्दी पूल आदी ठिकाणी महापालिका प्रशासनाने निर्माल्य कलश ठेवत कृत्रिम तलाव उभारले होते. नागरिकांनी या तलावात बाप्पाचे विसर्जन करत मूर्ती दान केले. मूर्ती संकलन करण्यासाठी विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेतला होता.

टॅग्स :NashikनाशिकGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव