नाशिक : गंजमाळ येथे फर्निचर विक्रेत्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या टेबल खुर्च्या सोफासेट आणि अन्य साहित्य महापालिकेच्या धडक कारवाईत अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत वाहतुकीला अडथळा असणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र महापालिकेच्या फुटपाथचा अशाप्रकारे बेकायदेशीररीत्या वापर करणाºयांना हा मोठा दणका महापालिकेने दिला आहे. शनिवारी (दि.१७) सायंकाळी अतिक्रमण विरोधी पथकाने गंजमाळ सिग्नल ते जुने बसस्टँडपर्यंत फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेले लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले महापालिकेची कारवाई सुरू होताच विक्रेत्यांमध्ये धावपळ उडाली. साहित्य तातडीने दुकानात घेतानाच साहित्य उचलून नेणाºया कर्मचाºयांना काही प्रमाणात विरोध केला. तथापि, पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. या मोहिमेत प्लास्टीकच्या ३०१ खुर्च्या, पाच सोफे, आदि साहित्य जप्त केले, त्यासाठी खास तीन पथक नियुक्त करण्यात आले होते, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.
गंजमाळ फुटपाथवरील फर्निचर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:56 IST
गंजमाळ येथे फर्निचर विक्रेत्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या टेबल खुर्च्या सोफासेट आणि अन्य साहित्य महापालिकेच्या धडक कारवाईत अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
गंजमाळ फुटपाथवरील फर्निचर जप्त
ठळक मुद्देधडक मोहीम : तीन ट्रक माल मनपाच्या भंडारात