शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

गंगापूर रस्ता बनला धोकादायक ; वाहतुकीची प्रचंड वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:39 AM

वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूर रोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स, लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

गंगापूर : वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूर रोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स, लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विद्या विकास सर्कलपासून ते थेट गंगापूर गावापर्यंत रस्त्यालगत असलेले हॉटेल, लॉन्स यांच्या व्यवसायामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.गंगापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक इमारती असून, ग्राहकांची सातत्याने गर्दी असते. ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडचण होत असतानाही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असून, पार्किंगची अधिकृत जागा नसनतानाही महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने रस्त्याचा अनधिकृत वापर वाढला आहे.नाशिकहून गंगापूर रोडमार्गे गिरणारे, हरसूल, तसेच गंगापूर गोवर्धनकडे सातत्याने वाहतूक सुरू असते. नेहमीच गजबजलेला गंगापूररोड हा आता अघोषित पार्किंगमुळे अधिक धोक्याचा बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यवसायांबरोबर हॉटेल्स, मॉल, दारू दुकाने, लॉन्स व खाद्याच्या गाड्यांनी हा रस्ता प्रचंड गजबजलेलाअसतो.सायंकाळी सहा वाजेनंतर या मार्गाने अनेक प्रवासी दुचाकीस्वार, बसगाड्या, चारचाकी वाहने सतत धावत असतात. याच मार्गावर विविध माध्यमिक शाळा व महाविद्यालये आहेत. औद्योगिक वस्तीकडून येणाऱ्या-जाणाºया वाहतुकीमुळेही सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. विद्यार्थी कामगार यांच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या सततच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावरील आडवी उभी असलेली चारचाकी वाहने नागरिकांच्या दृष्टीने कायमच डोकेदुखी ठरली आहे. उन्हाळ्यात लॉन्समधील पंचतारांकित विवाह सोहळ्यांमुळेही हा रस्तासामान्य वाहतूकदारांसाठी अत्यंत डोकेदुखी ठरला आहे. गंगापूर रोडच्या बेशिस्त बिनधास्त पार्किंगला चाप लावणार कोण हा सवाल नागरिक व प्रवासी करीत आहेत.गंगापूररोडवर रिक्षाप्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करीत असताना रात्री या रस्त्याला दुतर्फा बेशिस्तपणे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमुळे हा रास्ता अरुं द होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, अपघातांचे प्रकारही घडलेले आहेत. वाहनांच्या गर्दीतून मार्गक्रमण करावे लागते.- संजय परदेशी, रिक्षाचालकगंगापूररोड आधीच अरुंद आहे. त्यात रस्त्याच्या मधोमध दुभाजक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने व्यावसायिकांची गर्दी, वाढते हॉटेल्स, बार अ‍ॅन्ड रेस्टोरंट यांच्यामुळे नागरिकांना आपली वाहने चालवताना जीवघेणी कसरत करावी लागते. या रस्त्यावरील पार्किंगला कुठलीही शिस्त नाही.- आबा पाटील, रहिवासी

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा