शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आज होणार विसर्ग

By संजय पाठक | Updated: July 28, 2023 12:00 IST

यंदा नाशिकला उशिराने पाऊस सुरू झाला असून अद्याप गोदावरी नदीला पुरही आलेला नाही तर गंगापूर धरणातून आज पहिला विसर्ग सुरू होत आहे.

संजय पाठक

नाशिक- शहर परिसरात यंदा पावसाचा जोर कमी  असला तरी काही दिवसांपासून इगतपुरी- त्र्यंबकेश्वर  तालुक्यात चांगला पाऊस होत आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने हे धरण 70 टक्के भरले आहे त्यामुळे आज दुपारी बारा वाजता 539 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ करण्यात येणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

यंदा नाशिकला उशिराने पाऊस सुरू झाला असून अद्याप गोदावरी नदीला पुरही आलेला नाही तर गंगापूर धरणातून आज पहिला विसर्ग सुरू होत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे आणखी एक मुकणे धरण 62 टक्के भरले आहे. इगतपुरीतील दारणा धरणातून सध्या 10 हजार 514 क्यूसेक तर निफाड मधील नांदूरमाध्यमेश्वर मधून 5 हजार 576 क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरणWaterपाणी