शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे  गंगापूर धरण पर्यटनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:24 AM

नाशिक शहर व जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांना पाणी पुरविणाºया गंगापूर धरण परिसरात पर्यटनाला चांगला वाव असतानादेखील अधिकाºयांच्या अनास्थेचे बळी ठरलेले गंगापूर धरण व परिसरात पर्यटनाला अद्यापपावेतो सुरु वात न झाल्याने पर्यटक व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला असून, राज्याला महसुलातून मिळणाºया कोट्यवधी रुपयांना मुकावे लागले आहे.

गंगापूर : नाशिक शहर व जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांना पाणी पुरविणाºया गंगापूर धरण परिसरात पर्यटनाला चांगला वाव असतानादेखील अधिकाºयांच्या अनास्थेचे बळी ठरलेले गंगापूर धरण व परिसरात पर्यटनाला अद्यापपावेतो सुरु वात न झाल्याने पर्यटक व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला असून, राज्याला महसुलातून मिळणाºया कोट्यवधी रुपयांना मुकावे लागले आहे.  गंगापूर धरणातून संपूर्ण नाशिक शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, येथे साकारणाºया पर्यटन प्रकल्पामुळे विविध माध्यमातून पाण्याचे प्रदूषण होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. बोटींचे इंधन वा पर्यटकांकडून टाकण्यात येणारे खाद्यपदार्थ तसेच इतर घटक पाण्यात मिसळले तर त्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या १७ लाख लोकसंख्येच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. प्रदूषित पाण्यातील मासे सेवन केल्याने शरीरावरही याचा अनिष्ट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. धरणाविषयी अशा अनेक प्रकारच्या वावड्या उठविण्यात आल्याने गंगापूर धरण पर्यटनापासून वंचित राहिले.  सुरक्षेच्या दृष्टिकोनातून म्हटले तर आजपर्यंत शासनाने किती उपाययोजना केल्या आणि सुरक्षेची काय व्यवस्था केली तर त्याचे उत्तर सापडणे कठीण आहे. उलट त्यापलीकडे शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलापासून मुकावे लागले. धरण परिसरात गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या फौजफाट्यासह या भागातील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यानंतर आजच्या परिस्थितीत अचानक याठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी बांधकाम झाले असून, लवकरच याठिकाणी एक भव्य असे खासगी रिसॉर्ट उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे याला प्रशासनातील अधिकाºयांच्या छुप्या आर्थिक हातमिळवणीतून पाठबळ देण्यात आल्याचे समजते.पक्ष्यांचा अधिवाससन २०११ पासून मनोरंजन पार्कचे काम आजपर्यंत चालूच आहे त्याला जबाबदार कोण? जिल्ह्यातील एक रम्य ठिकाण म्हणून गंगापूर धरण परिसराने आपला लौकिक राखला आहे. येथे विदेशी आणि विविध जातींच्या देशी पक्ष्यांचा आशियाना असतो. देशातील महत्त्वपूर्ण पक्षिस्थळ म्हणूनही गंगापूर धरण ओळखले जाते.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणtourismपर्यटन