शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

गंगापूर धरण 99 टक्के भरले; नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 2:28 PM

सध्या हे धरण 99 टक्के भरले असून, धरणाचा जलसाठा 5 हजार 565 दलघफू इतका आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही भागांना परतीच्या पावसाने आठवडाभरापूर्वी झोडपून काढले. मात्र इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक सुरगाणा पेठ या तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिली असून, त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सध्या हे धरण 99 टक्के भरले असून, धरणाचा जलसाठा 5 हजार 565 दलघफू इतका आहे.आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्तास गंगापूर धरणातून विसर्ग हा थांबवला गेला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात देखील पावसाची विश्रांती आहे. समूहातील गौतमी त्र्यंबकेश्वर काश्यप या भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. आंबोली परिसरात पावसाची अधूनमधून जोरदार हजेरी सुरू असल्यामुळे काही प्रमाणात गंगापूर धरणात पाण्याची आवक होत असल्याने धरण साठा हा वाढता वाढत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण 98. 85% भरले. पहाटेपर्यंत आंबोली परिसरात 16 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.गंगापूर समूहातील काश्यपी 71 तर गौतमी गोदावरी 85 टक्के इतके भरले आहे. मागील 4 दिवसांपूर्वी 268 क्यूसेक इतका विसर्ग सुरू होता; मात्र पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने आता विसर्ग थांबविला गेला आहे. गंगापूर धरण भरल्याने नाशिककरांचा वर्षभराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला असून, पाणीकपात टळली आहे. तसेच मुकणे धरण 84 टक्के तर दारणा 99.17इतके भरले आहे. जिल्ह्यातील भावली, भाम, वालदेवी, वाकी, कडवा, भोजपूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. दारणा धरणातून होणारा विसर्गही थांबविला गेला आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान दृष्टीक्षेपातनाशिक शहरातसुद्धा पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात आतापर्यंत या हंगामात 811.5मिमी पर्यंत पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सरासरी 1075 मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक 3057 मिमीपर्यंत पाऊस पडला तर त्र्यंबकेश्वरला 2 हजार 166, पेठमध्ये 2हजार 45 मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. सर्वात कमी देवळा तालुक्यात 422 मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकली. मागील वर्षी जिल्ह्यात हंगामात सरासरी 1 हजार 427 मिमीपर्यंत पाऊस पडला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी राहिले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashikनाशिक