गंगाम्हाळुंगीच्या शेतकऱ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

By Admin | Updated: July 23, 2015 00:34 IST2015-07-23T00:34:36+5:302015-07-23T00:34:50+5:30

गंगाम्हाळुंगीच्या शेतकऱ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

Gangaijalangi's farmer's suicide attempt | गंगाम्हाळुंगीच्या शेतकऱ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

गंगाम्हाळुंगीच्या शेतकऱ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

नाशिक : पत्नीचे मंगळसूत्र विकूनही खतासाठी पैसे कमी पडत असल्याच्या नैराश्येतून गंगाम्हाळुंगी येथील शेतकरी भाऊराव शंकर पालवे (५०) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली़ या शेतकऱ्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
पालवे यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाम्हाळुंगी येथे भाऊराव पालवे यांची शेतजमीन आहे़ शेतातील पिकांसाठी त्यांना युरिया, सुफला या खतांची आवश्यकता होती़ मात्र, त्यांच्याकडे केवळ पाचशे रुपये असल्याने त्यांनी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र विकण्यासाठी सोनाराकडे नेले; परंतु सोन्याला भाव कमी झाल्याने खतांसाठी आवश्यक असलेल्या रकमेची पूर्तता होत नव्हती़ यामुळे नैराश्य आलेल्या पालवे यांनी दुपारच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला़
वडिलांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुलांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़; मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते़ दरम्यान, खतांसाठी पैसे नसल्याच्या नैराश्येतून वडिलांनी हे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या मुलांनी दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: Gangaijalangi's farmer's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.