शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षातून प्रवाशांचे दागिने, पैसे चोरणारी परप्रांतीय टोळी गजाआड

By नामदेव भोर | Updated: July 16, 2023 19:23 IST

संशयितांनी घेतला होता लॉजमध्ये आश्रय

नाशिक : शहरातील विविध भागांत रिक्षांमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या बॅगमधील दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट एकने माग काढला असून या टोळीतील तिघांना युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक प्रशांत मरकड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विजय ममता थिएटरजवळ कारवाई करत संशयित साजिद वाजिद अली (३९ रा. गावअब्दुल्लापूर कुरेशी, बिजनोर उत्तर प्रदेश), मुस्तकीन बुंदू (३९ रा. गौसपूर,बिजनोर, उत्तरप्रदेश) सोनू मोहम्मद आबिद मोहम्मद हुसेन शेख (२८, रा. सबदलपूर, बिजनोर उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेऊन त्यांनी त्यांच्याकडून सोने व रोख रक्कम असा चोरीचा ३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनानुसार, पोलिस अंमलदार रवींद्र बागुल, संदीप भांड, प्रवीण वाघमारे, नझीम पठाण, विशाल देवरे, विशाल काठे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ यांच्या पथकाने विजय ममता थिएटरजवळील लोंढेज गेस्टे हाऊस येथे कारवाई करून तिन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या.आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस