ठेंगोडा येथे सिध्दिविनायक मंदिरात गणेश याग सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:15 IST2021-02-14T21:16:20+5:302021-02-15T00:15:01+5:30
लोहोणेर : ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त द्वि दिन गणेश यागास उत्साहात प्रारंभ झाला.

माघी गणेश जयंतीनिमित्त ठेंगोडा येथील स्वयंभु सिद्धिविनायक मंदिरात सुरु असलेला गणेश याग.
लोहोणेर : ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त द्वि दिन गणेश यागास उत्साहात प्रारंभ झाला.
माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला गणरायाचा जन्म झाल्याने माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या द्वि दिन गणेश यागाची सांगता सोमवारी (दि.१५) दुपारी बारा वाजता श्री गणेश जन्मोत्सवाने होणार आहे.
या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी (दि.१४) सकाळी नऊ वाजता मुख्य पूजेला प्रारंभ झाला असून सोमवारी दुपारी बारा वाजता गणेशाच्या जन्मोत्सव उत्सवाच्या नंतर महाआरती आरती होऊन महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी दिली.