गणेश वाळके याला ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 23:15 IST2021-08-29T23:11:16+5:302021-08-29T23:15:02+5:30
जळगाव नेऊर : राजीव गांधी स्टेडियम, न्यू दिल्ली येथे झालेल्या युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर ॲथलेटिक्समध्ये जळगाव नेऊर येथील गणेश शंकर वाळके याला सुवर्णपदक मिळाले.

नवी दिल्ली येथे राजीव गांधी स्टेडियममध्ये झालेल्या २०० मीटर ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक स्वीकारताना गणेश वाळके.
ठळक मुद्देवाळके हा कोपरगाव येथील के .जे .सोमय्या कॉलेजचा विद्यार्थी
जळगाव नेऊर : राजीव गांधी स्टेडियम, न्यू दिल्ली येथे झालेल्या युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर ॲथलेटिक्समध्ये जळगाव नेऊर येथील गणेश शंकर वाळके याला सुवर्णपदक मिळाले.
वाळके हा कोपरगाव येथील के .जे .सोमय्या कॉलेजचा विद्यार्थी असून जळगाव नेऊर येथील लक्ष डिफेन्स अकॅडमीमध्ये गेली सहा महिन्यापासून सराव करत होता. त्याला निवृत्त सुभेदार आनंद गुंड यांचे मार्गदर्शन लाभले.