देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:11 IST2019-04-16T17:11:11+5:302019-04-16T17:11:17+5:30
कळवण : चैत्रोत्सवानिमित्त आदिमाया श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो देवीभक्त कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे दर्शनासाठी मार्गस्थ होतात. या देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले असून, मोफत पाववडे, चहा, बिस्किटे, गोळ्या औषधे, पोहे, पाणी वाटप केले जात आहे.

देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले
कळवण : चैत्रोत्सवानिमित्त आदिमाया श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो देवीभक्त कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे दर्शनासाठी मार्गस्थ होतात. या देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले असून, मोफत पाववडे, चहा, बिस्किटे, गोळ्या औषधे, पोहे, पाणी वाटप केले जात आहे.
महाराजा मित्रमंडळाचे संस्थापक सतीश पगार, राज देवरे, नीलेश कायस्थ, राहुल पगार, संदीप पगार, बापू जाधव, शांताराम सोनवणे, नाना देवघरे यांच्या उपस्थितीत सकाळपासून हजारो देवीभक्तांना मोफत पाववडे वाटप करण्यात आले. यावेळी निंबा पगार, संदीप पगार, राहुल पगार, नीलेश कायस्थ, केदा जाधव, शांताराम सोनवणे, प्रसाद उपासनी, किसान नेते गणपत पगार, संजय देवघरे, गुड्डू पगार, संजय देवरे आदींनी यात सहभाग घेतला. कळवण शहरात व नांदुरी मार्गावर ठिकठिकाणी देवी भक्तांच्या सेवेसाठी विविध मंडळांकडून सेवा केली जात आहे.