नाशिक- शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून गणेश उत्सव उत्साहात सुरू होता. आज भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. नाशिकमध्ये सकाळ पासून विर्सजन होत असले तरी पर्यावरणपूरक विसर्जनावर भर दिला जात आहे.
नाशिक महापालिकेच्यावतीने शहरातील तीन नद्यांच्या काठी अधिकृत २८ विसर्जन स्थळे घोषीत करण्यात आली असून ४६ कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी महापालिकेच्यावतीने तसेच सेवाभावी संस्थांच्या वतीने विसर्जित मूर्तींचे दान स्वीकारले जात आहेत. याशिवाय यंदा महापालिकेने टॅन्क आॅन व्हील म्हणजे सहा फिरते कृत्रीम तलाव तयार केले असून ते सहा विभागात ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या ठिकाणी ते मागणीनुसार उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यासाठी ३५ गृहनिर्माण संस्थांनी मागणी नोंदवली आहे. तर यंदाही आॅनलाईन टाईम स्लॉट बुकींगची सोय विसर्जनाची गर्दी टाळण्यााठी करण्यात आली आहे.त्यामुळ अडीच हजाराहून अधिक नागरीकांनी गर्दी टाळून विसर्जन करण्यासाठी वेळेची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, रामकुंड परीसरात महापालिकेच्या विसर्जीत मूर्ती घेऊन जाणाऱ्या एका मालट्रकने धडक दिल्याने एक जण जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.