गांधीनगर प्रेस कामगार युनियन निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:04 IST2019-03-19T22:32:45+5:302019-03-20T01:04:38+5:30
गांधीनगर प्रेस कामगार युनियनची द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. जनरल सेक्रेटरीपदी रवि आवारकर बिनविरोध निवडून आले.

गांधीनगर प्रेस कामगार युनियन निवडणूक बिनविरोध
नाशिक : गांधीनगर प्रेस कामगार युनियनची द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. जनरल सेक्रेटरीपदी रवि आवारकर बिनविरोध निवडून आले.
भारत सरकारच्या गांधीनगर येथील मुद्रणालयात मान्यताप्राप्त अधिकृत प्रेस कामगार युनियन असून, या युनियनची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विभागीय प्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी या दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड पार पडल्याने कामगारांनी एकजुटीचे दर्शन घडविले. आवारकर यांच्याबरोबरच के. एस. व्यंकटेश, समद शेख, शेखर साळुंके, गणेश रोकडे, शशिकांत जाधव, भिका जाधव, शांताराम रुपवते हे सदस्यदेखील निवडून आले. निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी संजय डोंगरे, मनोहर बोराडे, संजय घुगे, विजय वाघडे, भरत भोगले, रवि महाले, अनिल गायकवाड, शिवपाल पंचभाई, प्रवीण पवार यांनी परिश्रम घेतले.