लोहोणेर ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी अशीही गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 07:30 PM2021-03-21T19:30:42+5:302021-03-21T19:31:52+5:30

लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डमुळे करवसुलीकरीता थकबाकीदाराने आपल्याकडील थकीत बाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव शक्कल लढविली असून थकबाकीदारास गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करीत वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष धडक मोहिमेस थकबाकीदारांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Gandhigiri for the recovery of taxes of Lohoner Gram Panchayat | लोहोणेर ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी अशीही गांधीगिरी

लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने धडक वसुली मोहिमेकरिता गांधीगिरी करीत वसुलीनंतर गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करताना यु. बी. खैरनार, भूषण आहिरे, बापू आहिरे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देअजब शक्कल : थकबाकीदारांचे गुलाबपुष्प देऊन मानले आभार

लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डमुळे करवसुलीकरीता थकबाकीदाराने आपल्याकडील थकीत बाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव शक्कल लढविली असून थकबाकीदारास गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करीत वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष धडक मोहिमेस थकबाकीदारांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

लोहोणेर ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपुरवठा बाकी, जागा भाडे आदी मोठ्या प्रमाणावर थकीत असून मार्च अखेर असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने धडक वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी यु.बी. खैरनार, वसुली क्लार्क भूषण आहिरे, बापू आहिरे हे रविवारी सुट्टी असतानाही गावात वसुली करीत फिरत होते. विशेष बाब म्हणजे ज्या थकबाकीदार ग्राहकांनी आपली बाकी जमा केली त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त केले जात होते.
येत्या ३० मार्चपर्यंत आपली बाकी न भरल्यास त्यांची नावे डिजिटल बोर्डावर जाहीररीत्या ग्रामपंचायतीच्या वतीने यादीनुसार भरचौकात लावणार असल्याने थकबाकीदार आपली बाकी जमा करण्यास सहकार्य करीत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Gandhigiri for the recovery of taxes of Lohoner Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.