नांदगावी तालुका कॉग्रेसतर्फे पेट्रोलपंपावर गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST2021-06-09T04:18:46+5:302021-06-09T04:18:46+5:30

पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा पार केला आहे. डिझेलचे दरही वाढलेले आहेत. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी ...

Gandhigiri at petrol pump by Nandgaon Taluka Congress | नांदगावी तालुका कॉग्रेसतर्फे पेट्रोलपंपावर गांधीगिरी

नांदगावी तालुका कॉग्रेसतर्फे पेट्रोलपंपावर गांधीगिरी

पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा पार केला आहे. डिझेलचे दरही वाढलेले आहेत. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी अजून अडचणीत आलेला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही वाढले असून सबसिडीही मिळत नाही. केंद्रातील भाजप सरकारचे धोरणाविरुद्ध नांदगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नांदगाव शहरातील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. तसेच पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे पुष्प देऊन ‘अच्छे दिन आले, पेट्रोल- डिझेलची दरवाढ झाली, महागाई वाढली’ असे म्हणून प्रतीकात्मक ग्राहकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष समाधान पाटील, नगराध्यक्ष चेतन पाटील, कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर पवार, संदीप पाटील, सुनील पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो - ०८ नांदगाव १

नांदगाव येथील पेट्रोलपंपावर इंधन दरवाढी विरोधात कॉंग्रेसतर्फे गांधीगिरी मार्गाने करण्यात आलेले आंदोलन.

===Photopath===

080621\08nsk_18_08062021_13.jpg

===Caption===

नांदगाव येथील पेट्रोलपंपावर इंधन दरवाढी विरोधात कॉंग्रेसतर्फे गांधीगिरी मार्गाने करण्यात आलेले आंदोलन. 

Web Title: Gandhigiri at petrol pump by Nandgaon Taluka Congress