पेठ तालुक्यात गांधी -शास्त्री जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 16:04 IST2020-10-02T16:03:53+5:302020-10-02T16:04:36+5:30

पेठ : तालुक्यातील शाळा व महाविद्यालयासह विविध ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

Gandhi-Shastri Jayanti celebration in Peth taluka | पेठ तालुक्यात गांधी -शास्त्री जयंती साजरी

पेठ तालुक्यात गांधी -शास्त्री जयंती साजरी

ठळक मुद्देशारीरिक अंतर ठेऊन महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन

पेठ : तालुक्यातील शाळा व महाविद्यालयासह विविध ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेच्या वतीने कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संजय वाघ, शहराध्यक्ष त्र्यंबक कामडी, छगन चारोस्कर, संकेत नेवकर आदी उपस्थित होते. खोकरतळे येथील ग्राम पंचायत कार्यालयात पंचायत समिती सदस्य तुळशिराम वाघमारे यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कोरोनामुळे शाळा महाविद्यालय बंद असल्याने शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी शारीरिक अंतर ठेऊन महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
(फोटो ०२ पेठ)
पेठ पोलीस ठाण्यात गांधी जयंती निमित्त कोरोना योध्यांचा सन्मान करतांना भारतीय जनता पार्टीचे सदस्य.

Web Title: Gandhi-Shastri Jayanti celebration in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.