जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:20 IST2019-04-10T23:19:42+5:302019-04-10T23:20:52+5:30
मालेगाव : येथील मोसम नदीकिनारी मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
ठळक मुद्दे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मालेगाव : येथील मोसम नदीकिनारी मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जुगाराचे साहित्य, १० हजार ३९० रुपयांची रोकड, आठ हजार ५०० रुपये किमतीचे भ्रमणध्वनी असा एकूण १८ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोसम नदीकिनारी कलिमुद्दीन समसुद्दीन शेख, पप्पू केदा पाटील, सुनील भाऊसिंग नवरे, मनोज रतन माळी, आमीन शेख, इम्रान शेख आदी जुगार खेळताना आढळून आले. अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस हवालदार देवीदास ठोके, दिनेश पवार, शरद देवरे, महारू माळी, किरण दासरवार आदींनी ही कारवाई केली.