जिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:28 AM2019-07-23T01:28:09+5:302019-07-23T01:28:31+5:30

जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे.

 The game of capricious rain in the district | जिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ

जिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. रविवारी (दि.२१) त्र्यंबकेश्वर वगळता जिल्ह्यात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस सुरू असताना सोमवारी (दि.२२) मात्र सहा तालुक्यांमध्ये केवळ रिमझिम पाऊस सुरू होता. अनेक तालुक्यांमध्ये तर लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. हवामान खात्याचे सर्व अंदाज गुंडाळून जिल्ह्णात पावसाचा सुरू असलेला खेळ धरणाच्या पाण्याची चिंता वाढविणारा ठरत आहे.
जिल्ह्णात उशिरा आगमन झालेल्या मान्सूनमुळे पावसाची अनिश्चितता अजूनही कायम आहे. गेल्या दि. ७ आणि ८ जुलै रोजी जिल्ह्णात सर्वदूर झालेल्या पावसामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले होते. दुष्काळाची झळ सोसणाºया तालुक्यांमध्येही पावसाच्या सरी बरसल्याने नदी, नाले वाहू लागले तर दोनच दिवसांच्या पावसाने धरणांची पातळीदेखील वाढली. आता पावसाने जोर धरला असे वाटत असताना पुन्हा दडून बसलेल्या पाऊन अधूनमधून डोकावत असतो तर कधी जोरदार हजेरी लावून दडत आहे. जिल्ह्णात पावसाच्या या लहरीपणामुळे मात्र शेतकरी पीकाविषयी साशंकदेखील झाले आहेत. पेरणीसाठी पूरक असलेला पाऊस झाल्यामुळे एकीकडे समाधान असले तरी पावसाच्या अनिश्चिततेचा फटका याच पिकांच बसू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्येदेखील पावसाची अनिश्चितता कायम आहे. इगतपुरीत २५ ते ५५ मि.मी. असा बरसणारा पाऊस गेल्या दोन दिवसांपासून १२ ते १५ मि.मी. नोंदला जात आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या आठवड्यापासून, तर त्र्यंबकेश्वरमध्येही पावसाने काहीशी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी अपेक्षित पाऊस होऊ न शकल्याने पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोडही झाला. या महिनाभरात त्र्यंबकेश्वरसह धरणक्षेत्रात देखील पाऊस नसल्यामुळे जुलैच्या मध्यावरच त्र्यंबकला निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील व्यापार, व्यावसायिकांमध्ये चिंता दिसून आली.
रविवारी पावसाचे दान; सोमवारी ठणठणाट
रविवार (दि.२१) रोजी चोवीस तासांत जिल्ह्णात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सर्वच सर्व ठिकाणी बरसलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात चांगलीच धावपळ झाली. दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यांमध्येही पाऊस झाल्यामुळे समाधान व्यक्त होत असताना सोमवारी मात्र सहा तालुक्यांत पावसाचा थेंबडी होऊ शकला नाही. रविवारी सिन्नरमध्ये १७ मि.मी. पाऊस झाला, तर सोमवारी केवळ ५ मि.मी. चांदवडला ६१ मि.मी. बरसल्या पावसाने सोमवारी अक्षरश: दांडी मारली. हीच परिस्थिती येवला, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण, कळवण आणि सुरगाणा येथील आहे.
या ठिकाणी समोवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पाऊसच होऊ शकला नाही. या उलट रविवारी येवल्यात ६७, देवळा ४४, नांदगाव ४५, मालेगाव ९२, बागलाण ३३, कळवण ३६ मि.मी., तर इतका पाऊस बरसला असताना दुसºया दिवशी टिपूसही बरसला नाही. मालेगावमध्ये सर्वाधिक ९२ मि.मी. इतका चांगला दमदार पाऊस बरसला मात्र दुसºयातर दिवशी तालुक्यात कुठेही पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे शून्य मि.मी. पावसाची नोंद झाली.

Web Title:  The game of capricious rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.