जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:58 IST2019-07-20T00:57:31+5:302019-07-20T00:58:42+5:30

पेठरोड परिसरातील मेघराज बेकरी पाठीमागे असलेल्या एका प्लॉटमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यवर्ती गुन्हे शाखा व म्हसरूळ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करीत गुरुवारी (दि.१८) सायंकाळी छापा टाकून १६ जुगार खेळणाऱ्यांना अटक केली आहे.

Gambling raid; 16 people arrested | जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांना अटक

जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांना अटक

पंचवटी : पेठरोड परिसरातील मेघराज बेकरी पाठीमागे असलेल्या एका प्लॉटमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यवर्ती गुन्हे शाखा व म्हसरूळ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करीत गुरुवारी (दि.१८) सायंकाळी छापा टाकून १६ जुगार खेळणाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत घटनास्थळावरून २५ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसरूळ शिवारात सर्व्हे नंबर ४१० च्या प्लॉट नंबर १० मधील पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांना मिळाली होती. त्याअधारे मध्यवर्ती गुन्हे शाखेने म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करीत जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

Web Title: Gambling raid; 16 people arrested