गजपंथ मंदिर अमृतमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:16 IST2019-02-09T01:16:12+5:302019-02-09T01:16:33+5:30

म्हसरूळ येथे असलेले श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ जैन मंदिरास या वर्षी १३०वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने अमृत महोत्सवाचे आयोजन १६ से १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्र मास मुनिश्री प्रसन्नसागरजी तसेच मुनिश्री पीयुषसागरजी महाराज संघ उपस्थित राहणार आहे.

Gajpanth Mandir Amritamohotsav | गजपंथ मंदिर अमृतमहोत्सव

गजपंथ मंदिर अमृतमहोत्सव

नाशिक : म्हसरूळ येथे असलेले श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ जैन मंदिरास या वर्षी १३०वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने अमृत महोत्सवाचे आयोजन १६ से १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्र मास मुनिश्री प्रसन्नसागरजी तसेच मुनिश्री पीयुषसागरजी महाराज ससंघ उपस्थित राहणार आहे.
मुनिश्री प्रसन्नसागरजी ससंघ दि. ७ फेब्रुवारीपासून मुुंबई येथून पायी यात्रेने निघाले असून १५ फेब्रुवारीस गजपंथास येथे पोहचणार आहे. १६ फेब्रुवारीस अमृत महोत्सवास सुरु वात होईल. दुपारी भारतातील जैन तीर्थक्षेत्रासंबंधी चर्चा करण्यासाठी तीर्थरक्षा संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी मुनिश्रींच्या सानिध्यात आनंद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Gajpanth Mandir Amritamohotsav