इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील पाडळी येथील रेल्वे सिग्नल टेम्परिंग करून जून महिन्यात महिला प्रवाशांच्या पर्समधून ५८ हजारांचा ऐवज चोरणाऱ्या परराज्यातील टोळीचा लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी यांनी शोध लावला आहे. संबंधित ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता अरुण दुबे (४८) रा. वॉर्ड नं २, आसरल गर्ल्स हॉस्टेलजवळ, रिवा निपानिया, मध्यप्रदेश, सहफिर्यादी सीमाकुमारी ललितेश्वर प्रसाद (४१) रा. रामकृष्ण मदर टेरेसा पथ, पाटणा, बिहार या दि. २३ जून रोजी पाटलीपुत्र एक्स्प्रेसने कुर्ला ते सतना व पाटणा असा प्रवास करीत होते. रेल्वे स्टेशन पाडळी येथे रेल्वेचा सिग्नल टेम्परिंग करून गाडी थांबलेली असताना संशयितांनी फिर्यादी व सहफिर्यादी यांची डोक्याखाली ठेवलेल्या लेडीज पर्समधील ५८ हजार रुपये जबरीने हिसकावून चोरून नेले. त्यांनी फिर्याद दिल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी येथे भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान,गुन्ह्याचा तपास करतांना मिळालेल्या माहितीवरून लोहमार्ग पोलीस ठाणे भरुच, गुजरात येथील दाखल गुन्ह्यात अटक आरोपी वाहनचालक दीपक महेंद्रसिंग प्रजापती (२२) रा. एचडब्ल्यूसी गोदामजवळ, पंजाबी कॉलनी टोहना, जि. फतेहबाद हरियाणा, मजूर काम करणारा सुखवीर महेंद्र वाल्मीक (२१), रा. राजनगर बस्ती वॉर्ड नं. २, टोहाना हरियाणा, सुरक्षारक्षक असलेला सन्नी उर्फ सोनी पुरण फुल्ला (३०) रा. राजनगर बस्ती वॉर्ड नं २ रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ, टोहाना, चंदीगड, हरियाणा, राहुल चेनाराम धारा/वाल्मीकी (२६)रा. टिळक नगर गोमर हॉस्पिटल जुना बस स्टँड जवळ, टोहाणा जि. फतेहबाद, हरियाणा यांनी पाडळी देशमुखजवळ पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये रेल्वे स्टेशन दरम्यान चोरी केल्याची कबुली दिली.राजस्थानातून घेतले ताब्यातघटनास्थळाचा डाटा प्राप्त केला असता यातील आरोपी यांनी वापरलेले मोबाईल ट्रेस झाले आहेत. कोटा रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना कोटा मध्यवर्ती कारागृह राजस्थान येथे भरती केले. या आरोपींना इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी कोटा राजस्थान येथून ताब्यात घेऊन अटक केली असून अधिक तपास प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सोपान भाईक, पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, राजेश सोनवणे, हेमंत घरटे, संतोष परदेशी, नीरज शेंडे, प्रमोद पाहाके, भाऊसाहेब गोहिल, सतीश खरडे, अमोल निचत, योगेश पाटील, रमेश भालेराव, नितीन देशमुख, धनंजय नाईक, भूषण उके, तुषार मोरे आदी करत आहेत.
रेल्वे सिग्नल टेम्परिंग करून प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 23:23 IST
इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील पाडळी येथील रेल्वे सिग्नल टेम्परिंग करून जून महिन्यात महिला प्रवाशांच्या पर्समधून ५८ हजारांचा ऐवज चोरणाऱ्या परराज्यातील टोळीचा लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी यांनी शोध लावला आहे. संबंधित ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रेल्वे सिग्नल टेम्परिंग करून प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड
ठळक मुद्देचार संशयितांना अटक : इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची कामगिरी