कवी संजय चौधरी यांना गदिमा साहित्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:22 IST2018-10-04T17:11:06+5:302018-10-04T17:22:17+5:30

पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते प्रदान

Gadeema Sahitya Award for poet Sanjay Chaudhary | कवी संजय चौधरी यांना गदिमा साहित्य पुरस्कार

कवी संजय चौधरी यांना गदिमा साहित्य पुरस्कार

ठळक मुद्देपुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते प्रदान


नाशिक : सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांना नुकतेच गदिमा साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कविताच माझी कबर या संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी, लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 25 वा राज्यस्तरीय गदिमा महोत्सव-2018 भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झाला. हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, दिग्दर्शक नागराज मंजुळे, आमदार महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, सुमित्र माडगुळकर आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
मानवी नात्यातील जीवन जाणिवांचं प्रत्ययकारी चित्रण संजय चौधरी यांच्या कवितेत आहे. त्यामुळेच ती कविता लोकाभिमुख होत आहे व वाचकांना भावते असे प्रतिपादन रमेश देव यांनी केले. याप्रसंगी संजय चौधरी यांनी आपल्या निवडक कवितांचे वाचन केले.

Web Title: Gadeema Sahitya Award for poet Sanjay Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.