शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांसमोरच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:58 IST

कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसताना लोक फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे काटेकोर पालन  करताना दिसत नाहीत. गर्दी टाळण्यासाठी  लग्नसमारंभातदेखील शंभरपेक्षा अधिक लोक अपेक्षित नाहीत, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फिजिकल डिस्टन्स  नियमांचे महत्त्व अधोरेखित केले असताना  लग्नसमारंभात मात्र त्यांच्या समक्ष फिजिकल डिस्टन्स नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देनाशकातील एका लग्न समारंभातील प्रकार

नाशिक : कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसताना लोक फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे काटेकोर पालन  करताना दिसत नाहीत. गर्दी टाळण्यासाठी  लग्नसमारंभातदेखील शंभरपेक्षा अधिक लोक अपेक्षित नाहीत, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फिजिकल डिस्टन्स  नियमांचे महत्त्व अधोरेखित केले असताना  लग्नसमारंभात मात्र त्यांच्या समक्ष फिजिकल डिस्टन्स नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.रविवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील काेरोना आढावा बैठक आटोपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याचे सांगताना लोक नियमांचे पालन करीत नसल्याची खंत व्यक्त करीत नागरिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त केली होती. शासकीय बैठक आटोपून अजित पवार हे सायंकाळी शहरात एका बड्या  राजकीय नेत्याकडील लग्न-सोहळ्यालाही उपस्थित राहिले. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींचीही सोहळ्याला उपस्थिती होती. अनेक शासकीय अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. लग्नसोहळ्यातील गर्दीमुळे कुठेही फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन होत नसल्याचे प्रत्यक्ष उपमुख्यमंत्र्यांसमोरच घडलेले दिसले. या सोहळ्याला अनेक लोक तर विनामास्क वावरत असताना दिसत होते. सोहळ्याची भव्यता आणि उपस्थित गर्दी पाहता कुणालाही डिस्टन्सच्या नियमांचे काही देणेघेणे नसल्याचे चित्र या ठिकाणी होते. सोहळ्याला येण्यापूर्वी फिजिकल डिस्टन्सची चिंता व्यक्त करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांसमोरच डिस्टन्स नियमाचा फज्जा उडाला. पत्रकार परिषदेतील त्यांचे विधान आणि प्रत्यक्ष गर्दीतील त्यांची उपस्थिती यामुळे  सोशल मीडियात चर्चा रंगली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारChhagan Bhujbalछगन भुजबळmarriageलग्न