अंदरसूलला फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:37 IST2020-04-30T18:37:38+5:302020-04-30T18:37:46+5:30
अंदरसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावचा आठवडे बाजार महिन्यापासून बंद असला तरी फुले चौकात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. या ठिकाणी किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकान व इतर दुकाने असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, मास्क वापराला हरताळ फासला जात आहे.

अंदरसूलला फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
अंदरसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावचा आठवडे बाजार महिन्यापासून बंद असला तरी फुले चौकात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. या ठिकाणी किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकान व इतर दुकाने असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, मास्क वापराला हरताळ फासला जात आहे.
आठवडे बाजार दिवशी व्यापारी पेठेत महात्मा फुले चौक परिसरात पूर्वभागातील लोक खरेदीसाठी येतात. फुले चौकात भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांची अरुंद रस्त्यामुळे गर्दी होते. याच ठिकाणी किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकान व इतर दुकानेही असल्याने शारीरिक सुरक्षित अंतर राखले जात नाही. येवला, कोपरगाव व वैजापूर तालुक्यातील अंदरसूलपासून जवळ असलेल्या खेड्यातील नागरिकांचा कामानिमित्ताने येथे वावर असतो. ही बाब गांभीर्याने घेणे गरजेची बनली आहे.
ग्रामपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला मंडई गावाच्या बाहेर खुल्या पटांगणावर हलविणे गरजेचे बनले आहे. मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांना अंतरावर बसता येईल व गर्दीही होणार नाही, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.