शहरातील गणेश मंडळांचा प्रशासनाच्या विरोधात रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:32 IST2017-08-23T00:32:10+5:302017-08-23T00:32:15+5:30
उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे गणेश मंडळांमध्ये प्रशासनाच्या विरोधात निर्माण झालेला रोष वाढत चालला असून, प्रशासनातील अधिकाºयांनी सबुरीने घ्यावे, यासाठी आता राजकीय दबावही टाकण्यात येत आहे.

शहरातील गणेश मंडळांचा प्रशासनाच्या विरोधात रोष
नाशिक : उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे गणेश मंडळांमध्ये प्रशासनाच्या विरोधात निर्माण झालेला रोष वाढत चालला असून, प्रशासनातील अधिकाºयांनी सबुरीने घ्यावे, यासाठी आता राजकीय दबावही टाकण्यात येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून रस्त्यावरच गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यात येत असल्याने त्या संदर्भात उच्च न्यायालयाने जनहित याचिकेद्वारे नियमावली ठरवून दिली आहे. सध्या गणेशोत्सवाची तयारी वेगात सुरू असून, मंडळांकडून मंडप उभारणीचे काम केले जात असतानाच उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी प्रशासनातील अधिकाºयांचे पथक प्रत्येक मंडळाला भेट देऊन त्यांच्याकडून नियम, निकषांची पूर्तता करून घेत आहे. त्यासाठी विविध परवानग्यांचा आग्रह धरला जात असून, रहदारीस अडथळा ठरणाºया मंडपांना परवानगी नाकारली जात असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. ऐन उत्सवाच्या तोंडावरच प्रशासनाने कठोर पावले उचलल्यामुळे उत्साहावर विरजण पडले असून, बºयाच मंडळांनी केलेली तयारी वाया गेली आहे तर काहींना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला आहे. उत्सवाच्या तीन दिवस अगोदर मंडळांनी सर्व शासकीय अनुमत्या घेणे बंधनकारक करण्यात आल्याने गणेशभक्तांची त्यासाठी धावपळ सुरू असताना त्यात दररोज नवनवीन अटी, शर्तींची भर टाकण्यात येत असल्याने सार्वजनिक मंडळे एकत्र येऊ लागली आहेत. प्रशासनाचा अन्याय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींना मध्यस्थी करण्यासाठी गळ घातली जात आहे. राजकीय पक्ष व त्यांच्या पदाधिकाºयांसाठीदेखील गणेशोत्सव हा तितकाच महत्त्वाचा उत्सव असून, त्या माध्यमातून आपला राजकीय स्वार्थ साधणाºया लोकप्रतिनिधींनी याबाबत थेट अधिकाºयांनाच संपर्क साधून सबुरीने घेण्याची गळ घालण्यास सुरुवात केली आहे.