नांदूरवैद्य येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:10 IST2021-02-06T18:08:49+5:302021-02-06T18:10:40+5:30
नांदूरवैद्य : येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन जनजागृती करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निधी संकलनासाठी टाळमृदंगाच्या गजरात प्रभातफेरी काढत जनजागृती करण्यात येत आहे. तालुक्यातील कलाकारांच्या सहाय्याने छोटे-मोठे कार्यक्रम सादर करीत निधी संकलनाचे काम जोमात सुरू आहे.

नांदूरवैद्य येथे राममंदिर बांधकामासाठी निधी संकलनाविषयी जनजागृती करतांना हिरामण नाठे, माजी उपसरपंच मोहन करंजकर, पोपटराव बोराडे व इतर ग्रामस्थ.
नांदूरवैद्य : येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन जनजागृती करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निधी संकलनासाठी टाळमृदंगाच्या गजरात प्रभातफेरी काढत जनजागृती करण्यात येत आहे.
तालुक्यातील कलाकारांच्या सहाय्याने छोटे-मोठे कार्यक्रम सादर करीत निधी संकलनाचे काम जोमात सुरू आहे. तालुक्यातील रामभक्तांनी भैरवनाथ मंदिरातील सभागृहात ग्रामस्थांना निधी संकलनाविषयी जनजागृती केली.
या जनजागृती कार्यक्रमामध्ये युवा मोर्चाचे ईगतपुरी तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे, पोपटराव बोराडे, भाऊसाहेब सायखेडे, रवी भागडे, सजन नाठे, हिरामन नाठे, मोहन करंजकर, सुरेश काजळे, मारूती डोळस, शिवाजी मुसळे, विनोद नाठे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.