वस्ती विकासासाठी निधी

By Admin | Updated: March 23, 2016 23:25 IST2016-03-23T23:23:36+5:302016-03-23T23:25:15+5:30

येवला : २ कोटी ३५ लक्ष रु पये मंजूर

Fund for the development of the town | वस्ती विकासासाठी निधी

वस्ती विकासासाठी निधी

 येवला : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून येवला मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्याच्या योजनेखाली ६९ कामांना जिल्हा परिषदेने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ६९ कामांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध वसाहतीचा विकास करण्यासाठी रस्ता कॉँक्रीटीकरण, गटार बांधकाम, सौरदीप बसविणे, समाजमंदिर, सामाजिक सभागृह, नळ पाणीपुरवठा योजना, पाण्याची टाकी व पाइपलाइन या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी २ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
तालुक्यातील पिंपळगाव लेप, पाटोदा, गुजरखेडे, खामगाव, महालखेडा, निमगाव, मढ, जळगाव नेऊर, देशमाने खु., एरंडगाव खु. डोंगरगाव, खरवंडी, निळखेडे, राजापूर, अंगुलगाव, सायगाव, बोकटे, पिंपळगाव जलाल, बाभूळगाव खु., नागडे, अंदरसूल, नांदूर, चांदगाव, नायगव्हाण, खिर्डीसाठे, नगरसूल, शिरसगाव लौकी, मुखेड, कोळम बु., कोटमगाव खु., पाटोदा, कोटमगाव बुद्रुक, कुसूर, बल्हेगाव, अंगणगाव शिवाय येवला मतदारसंघात जोडलेली निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव वनस, नांदूरमधमेश्वर, रुई, शिरवाडे वाकद, धारणगाव वीर, धानोरे, देवगाव, सारोळेथडी, खडकमाळेगाव, लासलगाव, टाकळी विंचूर, वनसगाव, ब्राह्मणगाव (विंचूर), निमगाव वाकडा, गोंदेगाव, कानळद, पाचोरे खुर्द, टाकळी विंचूर, पाचोरे बुद्रुक या गावात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेखाली कामे मंजूर झाली असल्याची माहिती आमदार छगन भुजबळ यांच्या संपर्ककार्यालयातून देण्यात आली आहे. ( वार्ताहर )

Web Title: Fund for the development of the town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.