शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कादवाच्या इथेनॉल प्रकल्पास संपूर्ण सहकार्य :नरहरी झिरवाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:22 IST

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालवणे शक्य नाही. त्यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. कादवाने इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची केलेली तयारी स्वागतार्ह असून, इथेनॉल प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.

ठळक मुद्देगळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी आश्वासन; सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा

दिंडोरी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालवणे शक्य नाही. त्यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. कादवाने इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची केलेली तयारी स्वागतार्ह असून, इथेनॉल प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४४व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झिरवाळ यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप बनकर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, राज्य सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.झिरवाळ म्हणाले, कादवा हा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तारणहार असून, चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी कादवाला प्राधान्य देत आहेत. तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील तसेच कारखान्याचे डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्पास सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहनही झिरवाळ यांनीकेले. यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्प काळाची गरज असल्याचे सांगितले. कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कादवाच्या वाटचालीचा आढावा घेतला. शासनाने २५०० मे.टन प्रतिदिन गाळपास परवानगी दिली आहे. यंदा सुमारे दहा हजार हेक्टर ऊस नोंद झाली असल्याने एक महिना कारखाना लवकर सुरू केला. सूत्रबद्ध ऊसतोड कार्यक्र म आखत ऊसतोड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी मच्छिंद्र पवार (पाडे), खंडेराव दळवी (लखमापूर), विनायक देशमुख (खेडले), मधुकर बोरस्ते (हातनोरे), मीनानाथ जाधव (बोराळे) यांच्या हस्ते सपत्निक गव्हाण पूजन करण्यात आले. प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले. स्वागत प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकSugar factoryसाखर कारखानेNarhari Jhariwalनरहरी झिरवाळ