शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मालेगावचा फरार आरोपी अडीच वर्षांनी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 8:22 PM

मालेगाव : शासनाचा कोणत्याही प्रकारचा गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या गौण खनिज वाहतुकीच्या खोट्या व बनावट पावत्या करून शासनाची फसवणूक करून बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करून पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी गेल्या अडीच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी विलास निंबाजी शिंदे (५५) रा. आरती सोसायटी, प्लॉट नं. १००, देवपूर, धुळे यास द्याने - रमजानपुरा पोलिसांनी काल धुळे येथे छापा टाकून अटक केली.

४ मे २०१८ रोजी रमजानपुरा पोलिसात विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपी विलास शिंदे हा डंपर क्रमांक एमएच ०४ एचडी ७०८६ मधून वाळू वाहतूक करताना मिळून आला होता. त्यावेळी ट्रक खाली करून पुरावा नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला. तसेच पोलिसांना धक्का मारून फरार झाला होता. गेल्या अडीच वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्याने सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना व्हॉट्स ‌ॲपवरून धमकी दिल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी रचला सापळापोलीस उपनिरीक्षक सुभाष आगे, पोलीस कर्मचारी प्रशांत सोमवंशी, सुनील भामरे यांना शिंदखेडा येथील न्यायालयात आरोपी विलास शिंदे आल्याची माहिती मिळाल्याने दुपारी १२ वाजता त्यांनी तेथे सापळा लावला. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपी शिंदे हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर आडवा पडून प्रकृती बरी नसल्याचे त्याने भासवले. पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी केली असता तो आजारी असल्याचा बनाव करीत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून त्यास अटक करून रमजानपुरा पोलिसात आणण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी