मनमाडजवळील इंधन, कंपनीच्या प्रकल्पात गळती
By धनंजय वाखारे | Updated: October 20, 2023 14:08 IST2023-10-20T14:06:14+5:302023-10-20T14:08:00+5:30
अक्षरशः १० ते १५ मीटरपर्यंत इंधनाचे फवारे उडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले असून, सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले असून, त्यामुळे अतिसंवेदनशील इंधन प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मनमाडजवळील इंधन, कंपनीच्या प्रकल्पात गळती
मनमाड (नाशिक) :- नाशिकच्या मनमाडजवळील नागापूरच्या इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर इंधनाची गळती झाल्याची घटना समोर आली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास प्रकल्पातील येणारे इंधन अतिदाबाने आल्याने पाईप लाईनला गळती झाली. अक्षरशः १० ते १५ मीटरपर्यंत इंधनाचे फवारे उडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले असून, सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले असून, त्यामुळे अतिसंवेदनशील इंधन प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुरक्षेचे कारण देत कंपनी प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.गळती झालेली पाईप लाईन दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे कळते.या घटनेमुळे आज सकाळपासून इंडियन ऑइल प्रकल्पातून होणारी इंधन वाहतूक ठप्प झाल्याने मराठवाडा, खान्देशसह उत्तर महाराष्ट्राची इंडियन ऑइल पंपावर इंधन तुटवडा निर्माण होणार आहे.दरम्यान नागापूर ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात निवेदन देवून केली चौकशी मागणी केली असून, स्थानिक पोलिस व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या घटनेची चौकशी करीत आहेत.