पंचवटी महाविद्यालयासमोर एकावर चाकूने वार
By Admin | Updated: March 8, 2016 00:30 IST2016-03-08T00:28:52+5:302016-03-08T00:30:16+5:30
पंचवटी महाविद्यालयासमोर एकावर चाकूने वार

पंचवटी महाविद्यालयासमोर एकावर चाकूने वार
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून चौघा संशयितांनी एकावर चाकूने वार केल्याची घटना पंचवटी महाविद्यालयासमोर घडली़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि़४) सायंकाळी भूषण अंबादास खाडे (पेठकर प्लाझा, पेठ फाटा, पंचवटी) हा नयन मुर्तडक व जय खाडे यांच्यासमवेत चहाच्या टपरीवर उभा होता़ त्यावेळी संशयित चेतन पाटील ऊर्फ टिल्लू, अविनाश रणदिवे व त्यांचे दोन साथीदार तिथे आले़ त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून भूषण खाडे याच्या छातीवर चाकूने वार केले़ तसेच मुर्तडक व जय खाडेला मारहाण केली़ या प्रकरणी चौघा संशयितांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)