तीन तलाक विधेयकाविरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 15:59 IST2018-04-01T15:59:40+5:302018-04-01T15:59:40+5:30
निफाड- शहरातील मुस्लिम समाजाच्यावतीने केंद्र सरकारच्या तीन तलाक विधयकाविरोधात मुस्लिम महिलांचा मूकमोर्चा निफाड तहसील येथे काढण्यात आला.

तीन तलाक विधेयकाविरोधात मोर्चा
निफाड- शहरातील मुस्लिम समाजाच्यावतीने केंद्र सरकारच्या तीन तलाक विधयकाविरोधात मुस्लिम महिलांचा मूकमोर्चा निफाड तहसील येथे काढण्यात आला. याप्रश्नी निफाडच्या निवासी नायब तहसिलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. प्रारंभी शहरातील जामा मस्जिद येथून सकाळी अकरा वाजता मुस्लिम समाजातील महिलांनी मोर्चास प्रारंभ केला. हा मोर्चा शनीमंदीर , शिवाजी चौक मार्गे हा मुकमोर्चा काढत तहसील कचेरीवर आला. निफाडच्या नगरसेविका नूरजहाँ पठान , नगरसेविका शिरीन मणियार, अफरोज शेख , रजिया राजे ,अलविरा पठान यांनी निफाडच्या नायब तहसिलदार बाविस्कर यांना निवेदन दिले. यावेळी शहरातील मुस्लिम महिलांची मोठी उपस्थिती होती. सदरच्या मोर्चात बसपाचे जिल्हाध्यक्ष आसिफ पठान , इरफान सय्यद , तौसिफ मन्सूरी , तनवीर राजे , दबीर पटेल , जावेद शेख, शकील पठान, अय्यूब पठान , आरीफ मणियार, शाकीर शेख , वासिम पठान, अमजद शेख, हाजी मलंग, आसिफ अनसारी , लाला पठान , सलीम सय्यद , असलम शेख , वकील शेख ,पापा पठान,हाजी शेख सर ,दिलावर तांबोळी ,फिरोज इनामदार , वसीम मन्सूरी ,बबडी मुल्ला ,अनीस शेख ,वसीम तंबोली , मोईन पठान , तौसिफ शेख , नाजिम शेख , शकील शेख आदींसह मुस्लिम समाजातील महिला नागरिक सहभागी झाले होते.