मालेगावी इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 17:31 IST2018-09-10T17:30:39+5:302018-09-10T17:31:38+5:30

Front against Malegaavi fuel hike | मालेगावी इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

मालेगावी इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

राफेल घोटाळा व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील तालुका कॉँग्रेस कमिटी, राष्टÑवादी कॉँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार रविंद्र सायंकर यांना त्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. येथील कॉँग्रेस कमिटी कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा कॅम्परोडमार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बैलगाडीवर ठेवलेली दुचाकी लक्ष्यवेधी ठरली. मोर्चाचे कॅम्परोडवर सभेत रुपांतर झाले. यावेळी कॉँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रसाद हिरे, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, तालुका कॉँग्रेस अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गुलाबराव चव्हाण आदिंसह पदाधिकाºयांनी शासनाच्या धोरणावर टिका केली. यावेळी नायब तहसिलदार सायंकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात पीआरपीचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव, राष्टÑवादीचे आर. के. बच्छाव, कॉँग्रेसचे राजेंद्र ठाकरे, केवळ हिरे, मंगला तलवारे, बालन्ना गवळी, संतोष शेवाळे, पितांबर मोरे, चंद्रकांत गवळी, दिनेश ठाकरे, मोसिन शेख, नितीन बच्छाव, धर्मा भामरे, साहेबराव देवरे, संजय पवार, सतीश पगार आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Front against Malegaavi fuel hike