मित्रपाडा जि.प. शाळेस पाणी शुद्धीकरण यंत्र भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:21 IST2020-01-16T22:58:00+5:302020-01-17T01:21:23+5:30

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील दिवंगत केंद्रप्रमुख साहेबराव भगवान पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या तीन कन्या वसुंधरा पगार, पल्लवी पाटील ...

Friendship ZP Visit the school water purification machine | मित्रपाडा जि.प. शाळेस पाणी शुद्धीकरण यंत्र भेट

मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील मित्रपाडा जि.प. शाळेला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट देताना वसुंधरा पगार, पल्लवी पाटील, शीतल पाटील. समवेत मुख्याध्यापक मांडवडे, संदेश पवार, झुंबरलाल पवार, रामकृष्ण पवार, केवळ पवार, मदनलाल पवार, रतीलाल पवार आदी.

ठळक मुद्देमालेगाव : पित्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलींकडून कृतज्ञता

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील दिवंगत केंद्रप्रमुख साहेबराव भगवान पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या तीन कन्या वसुंधरा पगार, पल्लवी पाटील व शीतल पाटील यांनी पित्याचे दातृत्व जोपासत जिल्हा परिषद शाळा मित्रपाडा सौंदाणे या शाळेस पाणी शुद्धीकरण यंत्र भेट दिले.
आपल्या आई-वडिलांनी आयुष्यभर शिक्षक, केंद्रप्रमुख म्हणून सेवा केली. या उत्तरदायित्वाच्या भावनेतूनच हा उपक्रम राबविल्याचे त्यांच्या कन्यांनी सांगितले. या प्रसंगी विस्तार अधिकारी आत्माराम अहिरे, केंद्रप्रमुख सुरेश गुंजाळ, सोनज केंद्राचे केंद्रप्रमुख साहेबराव बच्छाव, शिक्षक दिलीप बच्छाव, जिल्हा परिषद शाळा वाकेच्या मुख्याध्यापिका विमल पवार, मित्रपाडा शाळेचे मुख्याध्यापक मांडवडे, संदेश पवार, झुंबरलाल पवार, रामकृष्ण पवार, केवळ पवार, मदनलाल पवार, रतीलाल पवार, सुरेश देवरे, किसन पवार, रमेश पवार, सुनील पवार, राहुल पवार, निशान पवार यांच्यासह परिसरातील नागरिक व पालक उपस्थित होते. स्वर्गीय साहेबराव पवार यांच्या पत्नी वाके शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमल पवार यांच्या हस्ते पाणी शुद्धीकरण यंत्र शाळेस भेट देण्यात आले. वटवृक्षाची लागवडही करण्यात आली. शिक्षक संदेश पवार यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title: Friendship ZP Visit the school water purification machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.