‘फ्रेंडशिप’दिनी सोशल मीडियावर संदेशांची धूम

By Admin | Updated: August 7, 2016 23:47 IST2016-08-07T23:46:55+5:302016-08-07T23:47:15+5:30

‘फ्रेंडशिप’दिनी सोशल मीडियावर संदेशांची धूम

'Friendship' dhoni messages on social media | ‘फ्रेंडशिप’दिनी सोशल मीडियावर संदेशांची धूम

‘फ्रेंडशिप’दिनी सोशल मीडियावर संदेशांची धूम

नाशिक : ‘वक्त की यारी तो हर कोई करता है, मेरे दोस्त मजा तो तब आये जब वक्त बदल जाये और यार न बदले’
‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ अशा मैत्रिपूर्ण भावना व्यक्त करणाऱ्या संदेशांनी सोशल मीडियावर मैत्रीचे बंध अधिक घट्ट करण्यात आले. रविवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर मैत्रीचे संदेश देण्याचा सिलसिला सुरू होता. दिवस मुला- मुलींचे भ्रमणध्वनी मैत्रीच्या संदेशांनी तुडूंब झाले होते. मैत्रीच्या नात्याचा अर्थ सांगणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. आपल्या मित्र-मैत्रिणींना फ्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध प्रकारच्या कविता, चारोळी आणि प्रतीकांचा वापर करीत शुभेच्छांचे अदानप्रदान करण्यात आले. दोस्तीचा अर्थ सांगणाऱ्या या दिनाचे औचित्य साधत अनेकांनी आपल्या भावना एकमेकांना भेटवस्तू देऊन सुद्धा व्यक्त केल्या. फुगे आकाशात सोडूनही आनंद व्यक्त केला गेला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Friendship' dhoni messages on social media