पिंपळगाव आगाराच्या एसटीतून मालवाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:35 IST2020-06-13T20:52:34+5:302020-06-14T01:35:09+5:30
पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे एसटीत प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी पिंपळगाव आगाराने एसटीमधून मालवाहतूक सुरू केली आहे. शहरातून पहिली मालवाहतूक पिंपळगाव ते वाशीपर्यंत बसने रवाना करण्यात आली.

या सेवेचा शुभारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी अनुष्का ट्रेडर्सचे संचालक गणेश जाधव, समर्थ ट्रेडिंगचे बाळकृष्ण थोरात, पिंपळगाव आगाराचे व्यवस्थापक विजय निकम, मच्छिंद्र पवार, अशोक गांगुर्डे, चालक संतोष चोले, पप्पू शेवाळे, संदीप कुयटे, संतोष आगळे आदी उपस्थित होते. पिंपळगाव आगारामध्ये अशा १५ मालवाहू ट्रक असून, मालवाहतूक व्हावी, यासाठी विशेष कक्षही स्थापन करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी एसटीच्या ट्रकमधून जिल्ह्याबाहेर माल वाहतूक करण्यात आल्याने व्यापारी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर मालवाहतुकीसाठी पिंपळगाव आगारात संपर्ककरून या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख विजय निकम यांनी केले आहे. तर मार्केट दरापेक्षा माफक दरात एसटीची माल वाहतूक सेवा मिळाल्यामुळे बसचा पर्याय निवडला असल्याचे गणेश जाधव यांनी सांगितले.