खिरमाणीत शॉर्टसर्किटमुळे फ्रीजचा स्फोट

By Admin | Updated: September 11, 2016 01:23 IST2016-09-11T01:23:46+5:302016-09-11T01:23:56+5:30

खिरमाणीत शॉर्टसर्किटमुळे फ्रीजचा स्फोट

Freeze explosion due to the short circuit | खिरमाणीत शॉर्टसर्किटमुळे फ्रीजचा स्फोट

खिरमाणीत शॉर्टसर्किटमुळे फ्रीजचा स्फोट

 द्याने : सटाणा तालुक्यातील खिरमाणी येथील देवीदास दामु भदाणे यांच्या शेतातील राहत्या घरात शॉर्टसर्किट होऊन फ्रीजचा स्फोट झाल्याने घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. भदाणे यांचे संपूर्ण कुटुंब रात्री कीर्तनाच्या कार्यक्र मास गेले असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
देवीदास भदाणे यांचे संपूर्ण कुटुंब कीर्तनाच्या कार्यक्र मास गेले असताना रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घरात वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने फ्रीजचा स्फोट झाला. स्फोटामुळे संसारोपयोगी भांडी, कपडे आदिंसह रोख रक्कम जळून खाक झाली. एकूण ६८३०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरपंच दिलीप भदाणे, संदीप शिरसाठ, प्रकाश भदाणे, पोपट भदाणे, विश्वास भदाणे, निवृत्ती भामरे यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने गॅस सिलिंडरचे स्वीच बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. जीवितहानी टळली. तलाठी श्रीमती एस. व्ही. सांगोले व ग्रामसेवक डी. एस. कापडणीस यांनी पंचनामा केला. भदाणे कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Freeze explosion due to the short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.