फ्रेंडशिपदिनी उत्साहाला उधाण

By Admin | Updated: August 8, 2016 01:07 IST2016-08-08T01:06:46+5:302016-08-08T01:07:02+5:30

कॉलेजरोडवर धूम : मित्र-मैत्रिणींनी गाठले त्र्यंबकेश्वर; सोमेश्वरलाही गर्दी

FREEDSHIPPDINI SPEAK SPEAK | फ्रेंडशिपदिनी उत्साहाला उधाण

फ्रेंडशिपदिनी उत्साहाला उधाण

नाशिक : मैत्रीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या आणि नव्या मैत्रीचा अध्याय सुरू करण्याचा फ्रेंडशिप दिवस कॉलेज तरुण-तरुणींनी उत्साहात साजरा केला. कॉलेजरोडवर तरुणाईला उधाण आले होते. लाल रंगाचे फुगे आणि रेशीमबंधाने मैत्रीची भावना व्यक्त करण्यात आली.
रविवार असल्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये मैत्रीचा दिवस साजरा करणे शक्य नसले तरी कॉलेजरोडवर मात्र तरुण-तरुणींनी एकमेकांना मैत्रीचे बंध बांधून आपले मित्रप्रेम अधिक घट्ट केले. एकमेकांना मैत्र दिनाच्या शुभेच्छा देत भेटवस्तूंचीही देवाण-घेवाण केली. तरुण-तरुणींच्या गर्दीने परिसरातील कॉफी शॉप आणि स्नॅक्स सेंटर गजबजले होते. तसेच अनेकांनी सोमेश्वर येथे सोमेश्वर धबधब्यानजीक तर काहींनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन रिमझिम पावसाचा आनंद लुटत मैत्रीची भावना व्यक्त केली.
दरम्यान, शहरातील ‘लव्हर्स पॉइंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदापार्ककडे मात्र कुणीही फिरकले नाही. पावसामुळे गोदापार्कची वाताहत झाली आहेच, शिवाय या परिसरात फ्रेंडशिप दिवस असल्याने पोलिसांचाही बंदोबस्त होता. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनी शहरालगतच्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आनंद घेतला.
सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर प्रमाणेच पांडवलेणी, देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडी, गिरणारे रोडवरील गंमत-जंमत तसेच जव्हार रोड येथे जाऊन मैत्री दिवस साजरा केला.

Web Title: FREEDSHIPPDINI SPEAK SPEAK