कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची मुक्तता

By Admin | Updated: June 12, 2017 01:17 IST2017-06-12T01:16:41+5:302017-06-12T01:17:44+5:30

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची मुक्तता

Freedom of slaughter animals | कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची मुक्तता

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची मुक्तता

नाशिक : आयशर वाहनामध्ये कत्तलीसाठी कोंबून नेत असलेल्या २१ गायी व गोऱ्ह्यांची आडगाव पोलिसांनी रविवारी (दि़११) सकाळी मुक्तता केली़ जनावरे व आयशर वाहन असा पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़
सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस गस्त घालीत असताना रस्त्याने भरधाव जाणाऱ्या आयशर (एमएच १७, बीडी ४७१६) वाहनाबाबत पोलिसांना शंका आली़ त्यांनी हा आयशर थांबवून पाहणी केली असता या वाहनात कत्तलीसाठी १५ गायी व ६ गोऱ्हे कोंबून नेले जात होते़ या सर्व जनावरांची मुक्तता करण्यात आली आली असून जनावरे खरेदी करणारा व्यापारी व वाहनचालक या दोघांना अटक करण्यात आली आहे़

Web Title: Freedom of slaughter animals